गेल्या 24 तासात नऊ पॉझिटिव्ह ; एक कोरोनामुक्त…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 27 नोव्हेंबर :-
गेल्या 24 तासात जिल्ह्यात नऊ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर एक जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 10 तर बाहेर जिल्ह्यात तीन अशी एकूण 13 झाली आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 289 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी नऊ अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 280 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72936 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71136 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये दारव्हा येथील एक, नेर येथील तीन, वणी येथील दोन व इतर शहरातील तीन रुग्णांचा समावेश आहे
जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष 64 हजार 781 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 91 हजार 738 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.54 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 3.11 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1763 बेड उपलब्ध :-
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 6 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1763 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 6 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 781 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….