नव्या व्हरियंट ची पालकांना चिंता ; मुलांना शाळेत पाठविण्यावरुन संभ्रम….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात पहिली ते चौथी आणि सातवीपर्यंतच्याही शाळा (School) या १ डिसेंबरपासून सुरू केल्या जात असतानाच आता पालकांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची (corona new variants) चिंता सतावत आहे.
नवा व्हेरियंट आल्यास आपल्या मुलांचे काय होईल, अशी भीती सतावत असल्याने मुलांना शाळेत (students school issue) पाठविण्यासाठी पालकांमध्ये (Parents confusion) मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दक्षिण अफ्रिकेत गेल्या काही आठवड्या समोर आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेनेही यासाठी जगभरात हाय अलर्ट जारी केला असल्याने मुंबईसह राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलांच्या शाळा सुरू करणे हे अत्यंत धोकादायक ठरेल अशी भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे. मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने त्याचे परिणाम मुलांच्या मानसिकतेवर झालेले आहेत, त्यामुळे शाळा सुरू झाल्या पाहिजेत.
मात्र यासाठी कोरोनासंदर्भातील सर्व प्रकारचे नियम आणि सोशल डिसटन्स पाळून काळजी घेणे आवश्यक असल्याचे अखिल भारतीय पालक संघटनेचे मुंबईतील पदाधिकारी प्रसाद तुळसकर यांनी सांगितले. तर शाळा सुरू करणे एकुणच धोकादायक ठरण्याची शक्यता असली तरी त्यासाठी सरकारने राज्यातील आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन यांच्याशी कायम समन्वय साधून शाळा सुरू कराव्यात, आणि त्यासाठी विशेष काळजी घेतली जाणे गरजेचे असल्याचे आप पालक युनियनचे अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
तर १ डिसेंबरपासून शाळा सुरू करणे हे धोकायदायक असल्याने यापुढे ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवणे हा एकच पर्याय असल्याचे इंडिया पॅरेंट असोसिएशनच्या ॲड. अनुभा सहाय म्हणाल्या. कोरेानाची नवी भीती पालकांपुढे आल्यावर ते आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी संमतीपत्र देण्यासाठी विचार करतील, आणि त्यांचा तो विचार त्यावेळी योग्य असेल असे मत मागासवर्गीय विद्यार्थी पालक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण यादव यांनी व्यक्त केले.
कोरोनाचा नवीन व्हेरियंट आल्यास शाळा आणि मुलांनाही धोका आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी खासगी शाळांनी दिलेल्या पर्यायांचा सरकारने नव्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे-पाटील यांनी व्यक्त केले.