बिनविरोध निवडीने नगरसेवकांचा हिरमोड ; विधान परिषद निवडणूक…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- विधान परिषद निवडणूक मध्ये अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत उमेदवारांच्या माघारीमुळे मुंबई , कोल्हापूर , धुळ्यातील निवडणूक बिनविरोध झाली विधान परिषदेच्या मुंबई, कोल्हापूर आणि धुळे स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघांतील निवडणूक बिनविरोध झाली. यामुळे ‘लक्ष्मीदर्शन’ होणार नसल्याने मतदार असलेल्या नगरसेवक मंडळींचा हिरमोड झाला.
कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार व गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे अमल महाडिक यांच्यातील लढत चुरशीची होण्याची शक्यता वर्तविली जात होती. उभय उमेदवार आर्थिकदृष्ट्या तगडे असल्याने नगरसेवक मंडळीही आशेवर होती. पण भाजपच्या महाडिक यांनी माघार घेतल्याने सारेच चित्र पालटले. राज्यमंत्री पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे कोल्हापूरमधील नगरसेवकांच्या पदरी निराशा आली. काँग्रेस उमेदवाराने माघार घेतल्याने मुंबई महापालिकेतून शिवसेनेचे सुनील शिंदे तर भाजपचे राजहंस सिंह यांची बिनविरोध निवड झाली.
धुळे मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड झाली. नागपूर व अकोला, बुलढाणा, वाशीम मतदारसंघात मात्र कोणत्याही उमेदवाराने माघार न घेतल्याने १० डिसेंबरला मतदान होईल.
अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत उमेदवारांच्या माघारीमुळे मुंबई, कोल्हापूर, धुळ्यातील निवडणूक बिनविरोध झाली. सहापैकी चार जागांवर बिनविरोध निवड झाली असून, भाजपला दोन तर काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली. निवडणूक बिनविरोध झाल्याने नगरसेवकांना ‘भाव’ मिळाला नाही.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..