माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या जिल्हा मुख्य प्रचार प्रमुख पदी राम जाधव…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :-
स्वराज बहुउद्देशीय संस्था संचलित माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ मुबंई च्या वतीने महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील समाजसेवक व माहिती अधिकार कार्यकर्ता मा.राम जाधव यांच्या कार्याची दखल घेत संस्थापक अध्यक्ष सुभास बसवेकर यांनी जिल्हा माहिती अधिकार महासंघाच्या मुख्यप्रचार प्रमुख म्हणून निवड केली आहे..
राम जाधव हे हिवरा येथील राहिवाशी असून त्यांनी आजपर्यंत विविध मुद्द्यावर माहिती अधिकार टाकून सर्वसामान्य गोरगरीब नागरिक, विधवा माता भगिनी, आदिवासी बांधव,दिवांग्य बांधव याना न्याय मिळवून दिले आहे.तसेच संपूर्ण तालुकाभर जाधव यांची लोकाभिमुख,माहितीगार,प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ओळख आहे.
सामान्य नगरिकाना संघर्ष, जनजागृती,व संरक्षण या मुद्यावर प्रामाणिक आणि सर्वव्यापी सेवा घडावी म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ कडून सेवाभावी, समाजसेवी,आणि माहिती अधिकारात जनतेच्या प्रश्नांना वाव देणाऱ्या व्यक्तींना सामावले जाते. या निवडीमुळे मा राम जाधव यांचे सर्वत्र जिल्हा भरातून कौतुक होत आहे.