खळबळजनक : हिंगोली येथील ५० शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे कडे मांगितली नक्षलवादी होण्याची परवानगी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगोली :- हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गावातील शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे नक्षलवादी होण्याची परवानगी द्यावी मागितली आहे . तहसीलदार यांचे मार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे .
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की यावर्षी झालेल्या पावसाने शेतकरी पुर्णतः उध्वस्त झाला आहे . शेतातील सोयाबीन , तूर , कापूस , उडीद , मूग ई पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . खरीप हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे आता रब्बी हंगाम हा महावितरणच्या आडमुठे धोरणामुळे जाण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे . कारण पिके ऐन मोसमात असताना महावितरणकडून शेतकरी यांची शेतातील वीज तोडणी करण्यात येत आहे .
वडिल जेलमध्ये असतानाही लेकींनी विजय खेचून आणला , सातारा जिल्हा बँक निवडणुकीची राज्यभर चर्चा शेतकरी अर्धी बिले भरण्यासाठी तयार असूनसुद्धा महावितरणचे अधिकारी ऐकायला तयार नाहीत . त्यामुळे शेतकरीवर्गात तीव्र नाराजी आहे . एकीकडे सरकारने शेतकऱ्यांना उजव्या हाताने मदत दिली , तिकडे मात्र बिल वसुलीच्या नावाखाली डाव्या हाताने जात असल्याचा प्रकार हिंगोली जिल्ह्यात घडत आहे . यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे थेट नक्षलवादी होण्यासाठी परवानगी मागितल्याने खळबळ उडाली आहे . या निवेदनावर गावातील पन्नासच्यावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….