सोयाबीन आणि हळदीने भरलेले जवळपास ९०० पोते संशयास्पद आढळले ; अं.५० लाखांचा माल असल्याचा संशय
👉 चोरीचा माल असल्याची शक्यता ; घटनास्थळी एसडीपीओंची भेट ;
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे असलेल्या निर्जनस्थळी सोयाबीन आणि हळदीने भरलेले जवळपास ९०० पोते रात्रीच्या सुमारास संशयास्पद आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.ही घटना आज (ता.१५) रात्री ८ च्या सुमारास उजेडात आली आहे.हा माल चोरीचा असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून या मालाची किंमत अर्ध्या कोटीच्या घरात असल्याचा अंदाज आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस निरीक्षक विलास चव्हाण ,पोलीस उपनिरीक्षक उमेश भोसले यांनी भेट दिली आहे.
( महागाव येथे निर्जन स्थळी सोयाबीन आणि हळदीने भरलेल्या पोत्यांचे छायाचित्र )
सूत्रांकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार ,
विदर्भाच्या सीमेवर असलेल्या मराठवड्यातील एका खाजगी वेअर हाऊस चोरट्यांनी फोडून मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकच्या साहाय्याने मध्यरात्री (ता.१४) महागाव शहरातील निर्जन स्थळी साठवून पोत्यांची गंजी लावून ठेवला. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी चोरट्यांनी व्यापारी आणि हमलाचा शोध घेतला.मात्र हमाल मिळत नसल्याने सदर सोयाबीन आणि हळदीने भरलेले पोते अनेकांच्या निदर्शनास आले.त्यामुळे या प्रकरणाचे बिंग फुटले. रात्रीची वेळ असल्याने नेमके सोयाबीन आणि हळदीचे किती पोते आहेत हे मोजण्यात आले नाही.परंतु जवळपास ९०० पोते असल्याचा कयास आहे.
मराठवाड्यातील एका खाजगी वेअर हाऊस मध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि हळदीचे पोते ठेवले होते.त्यावर अज्ञात चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना उघडकीस आली होती.या चोरीच्या घटनेची फिर्याद नजीकच्या पोलीस स्टेशनला देण्यात आल्याचे समजते , मात्र पोलिसांनी या प्रकारावर संशय उपस्थित केल्याने चर्चेला उधाण आले.काही तासांनंतर महागाव मधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे मोकळ्या जागेत सोयाबीन आणि हळदीचे पोत्यांची गंजी आढळुन आल्याने खळबळ माजली.आता या प्रकरणात महागाव पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे. महागाव मधील काही महाशयांचा या प्रकरणात सहभाग असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. खात्रीलायक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.वृत्त लीहे पर्यंत चोरट्यांचा सुगावा लागला नव्हता.