महागाव नगरपंचायत प्रभाग आरक्षण अपेक्षेपेक्षा जास्त समाधानकारक ; अनेकांच्या चेहऱ्यावर हसती खळी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ७२४९४४४८८८
महागाव :
महागाव नगरपंचायत आगामी निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षणाची आरक्षण सोडत आज (ता.१२) काढण्यात आली.यामध्ये राजकीय पुढाऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त समाधानकारक आरक्षण सोडत निघाल्याने अनेकांनी आता गुडघ्याला बांशिंग बांधून निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली आहे.
महागाव नगरपंचायत आगामी निवडणुकीसाठी उपविभागीय महसूल अधिकारी व्यंकट राठोड , नायब तहसीलदार डॉ.एस.एस. अदमुलवाड ,प्रभारी मुख्याधिकारी डॉ.किरण सुकलवाड यांच्या उपस्थितीत नगरपंचायत क्षेत्रातील १७ प्रभागासाठी आरक्षण सोडत ईश्वर चिठ्ठीने काढण्यात आली आहे.त्यामध्ये
प्रभाग क्रमांक १,१३,१४,१५,करिता सर्वसाधारण महिला , प्रभाग क्रमांक २ व ३ करिता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), प्रभाग ४ अनुसूचित जमाती महिला (ST महिला), प्रभाग ६,१०,आणि १७ साठी अनुसूचित जाती महिला (SC महिला), प्रभाग क्रमांक ५,८,९,१२,१६ सर्वसाधारण ,तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग करिता प्रभाग ७,११ आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
महागाव नगरपंचायत प्रभाग निहाय आरक्षण सोडतीनंतर हरकती व सूचना १६ नोव्हेंबरपर्यंत सादर करता येणार आहे .प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर सुनावणी १७ नोव्हेंबरपर्यंत देण्यात येणार असल्याचे परिशिष्ट १० मध्ये नमूद करण्यात आले आहे.