उभ्या ट्रकला दुचाकीची जबर धडक ; तरुणाचा मृत्यू ; महागाव येथील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
पुस नदी पुलावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून दुचाकीस्वाराने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज (ता.१६) सायंकाळी साडेसात वाजता सुमारास घडली आहे.किरण अशोक मुकाडे (२३) रा.महागाव असे मृतक दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की,
किरण हा आपले काम आटपून दुचाकी क्र. एमएच २६ बीयू ६७२१
ने महागाव कडे येत होता.पुस नदी पुलानजिक नादुरुस्त ट्रक उभा होता.या ट्रकच्या पाठीमागून दुचाकीस्वार धडकला.या घटनेची माहिती प्रहार कार्यकर्ते रानू कुरेशी ,सामाजिक कार्यकर्ते तेजस नरवाडे, रियाज पारेख यांना कळली.त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णवाहिकेस पाचारण करून उपचारार्थ सवना येथील ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना झाले . त्यादरम्यान दुचाकीस्वारास प्रहार कार्यकर्ते यांनी वाचविण्याचा शर्तीचे प्रयत्न केले.मात्र सवना येथील ग्रामीण रुग्णालयात पोहचताच किरणने अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले.वृत्त लेहीपर्यंत सदर ट्रक चालका विरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.