दिग्रसच्या तत्कालीन तहसीलदारांचा कामचुकारपणा ; तिन वर्षा पासून चौकशी गुलदस्त्यातच जिल्हाधिकारी साहेब लक्ष द्या हो…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे 9370464824
दिग्रस :- तिन वर्षापासून दिग्रस तहसीलचे तत्कालीन तहसीलदार बागडे,व वझीरे यांचा काम चुकारपणा मुळे शेकडो ब्रास रेती साठ्याच्या तक्रारीची चौकशी अहवाल करून कागदोपत्री कारवाईचा देखावा करून कार्यवाहीवर अंतिम शिक्कामोर्तब न केल्याने तिन वर्षांपासून चौकशी फाईल टेबलावर धुळ खात पडून आहे. होणाऱ्या कार्यवाहीने महसुलच्या तिजोरीत वाढ होणार असून याची जाणीव असतानाही तात्कालीन तहसीलदारांनी कर्तव्याला बगल देत रेती साठेबाजी करणाऱ्या च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तीन वर्षांत तीन इंचही चौकशी पुढे सरकली नाही. या प्रकरणात आता जिल्हा अधिकारी साहेब तुम्हीच लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे.या प्रकरणात महसूल प्रशासनाने रेती साठा करणाऱ्या पाठराखण करून महसूलची ऐसी तैसी करून येणारा लाखोंचा महसूल बुडविण्यासाठी अधिकारीच जबाबदार असल्याचे दिसून येते. या संबंधीत प्रकरणाची रीतसर तक्रार मुख्य सचिव, विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती, आपले सरकार पोर्टल, उपविभाग कार्यालय पुसद येथे करण्यात आली. यामध्ये तत्कालीन तहसीलदारांनी या सर्व वरिष्ठांच्या पत्रव्यवहाराला कचरा कुंडीत टाकले. मात्र अधिकाऱ्यांनी स्वतःच्या महसुलात वाढ करण्याची कोणतीही संधी सोडली नाही.या प्रकरणात कार्यवाही केल्याचा देखावा करून संपूर्ण प्रकरणाची मात्र अंतिम शिक्कामोर्तब फक्त बाकी असल्याने अखेर तत्कालीन दोन तहसीलदारांच्या अंतिम शिक्कामोर्तब न केल्याने लाखोचा महसूल बुडाला असून या प्रकरणाचा अंतिम शिक्कामोर्तब करण्याचे नव्याने रुजू होणारे तहसीलदारापुढे मोठे आव्हान असणार आहे. तिन वर्षा पासून थंडबस्त्यात असलेले या प्रकरणात जिल्हा अधिकारी साहेब तुम्हीच लक्ष देऊन ठोस कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दिग्रस नगर पालिकेत मागच्या दारातून राजकारण करणाऱ्या व राजकीय फायदा घेऊन पक्षाच्या वलयाखाली वावरणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकाने साई नगरमध्ये शिक्षण संस्थेच्या इमारतीच्या बांधकामासाठी कोणतीही परवानगी नसताना अथवा कुठलाही रेतीघाट हरास नसताना शेकडो ब्रास मोठ्या प्रमाणात रेती साठा करून ठेवल्याने नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मौका पाहणी पंचनामा करून तहसीलदारांकडे दाखल केला. मात्र अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही.