जिल्हाधिकारी यांनी जाणल्या निराधार वृद्धांच्या व्यथा ; उमरी पठार येथील वृद्धाश्रमाला दिली भेट…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 7 ऑक्टोबर :- कुणी पोटच्या मुलाशी पटत नाही म्हणून घर सोडले, तर मुलांनाच आई- वडील सांभाळणे जड झाले म्हणून मुलांनी आई- वडिलांना वृद्धाश्रमात आणून सोडले, कुणी निराधार तर कुणाला घरमालकांनी बाहेर काढून दिले, सांभाळायला कुणी नाही म्हणून शेजा-यांनी वृद्धश्रमात आणून ठेवले. अशी प्रत्येकाची वेगळी कथा आणि व्यथाही. उमरी पठार येथील संत श्री दोला महाराज वृद्धाश्रमात अशा निराधार ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा तेथील प्रत्येकाशी हितगुज साधत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मायेने जाणून घेतल्या.
शेषराव डोंगरे यांनी वृद्धांच्या सेवेचे व्रत घेऊन ज्येष्ठांचा सांभाळ करण्यासोबतच त्यांचे एकटेपण दूर करण्याचे जे काम निस्वार्थी भावनेने आरंभले ते प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गारही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी काढले.
यावेळी त्यांनी वृद्धाश्रमातील नागरिकांशी संवाद साधला. प्रत्त्येकाजवळ आपुलकीने जात वृद्धश्रमात कसे आले याची विचारपूस करतानाच इथे काही कमतरता आहे का याचीही आस्थेने माहिती घेतली. यावेळी अनेकांकडे आधारकार्ड नाही तसेच निराधार योजनेचा लाभ मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी 15 दिवसात याठिकाणी शिबिर आयोजित करून आधार कार्ड काढण्यासंदर्भात तहसीलदारांना सूचना दिल्यात, तसेच पात्र लाभार्थ्यांना निराधार योजनेचा लाभ देण्यासही सांगितले. सोबतच वैद्यकीय तपासणीचे शिबिरही आयोजित करणार असल्याचे सांगितले.
शेषराव डोंगरे यांनी सेवाभावी वृत्तीने चालविलेल्या या वृद्धाश्रमात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने शक्य ते सहकार्य करण्याची हमी जिल्हाधिकारी त्यांनी दिली.
2007 च्या ज्येष्ठ नागरिक कायद्याची करणार अंमलबजावणी
ज्येष्ठ नागरिकांना अपत्यांकडून निर्वाह भत्ता देण्याबाबतचा 2007 च्या कायद्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात येईल. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या यासंदर्भातील तक्रारी प्राप्त करून करून घेऊन अशा अर्जावर उपविभागीय अधिकारी यांच्या कडून आदेश करण्यात येईल. ही मोहीम महिनाभर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे, याबाबतचा सर्व उपविभागीय अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.


उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….