मिशन कवच कुंडल’ सप्ताहानिमित्त 8 ते 14 ऑक्टोंबर विशेष लसीकरण मोहीम ; उद्या एकाच दिवशी एक लक्ष लसीकरणाचे उद्दिष्ट ; एकूण 315 केंद्रावर होणार लसीकरण ; नागरिकांनी उत्स्फूर्तपणे लसीकरण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 07 :- कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने खुप दिवसांनी शाळा तसेच प्रार्थना स्थळे उघडली आहे. बाजारपेठा खुल्या आहेत. सण-उत्सव उत्साहात साजरे केल्या जात आहे. ही स्थिती अशीच कायम राहण्यासाठी आरोग्य मंत्र्यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन कवच कुंडल’ अभियान राबविण्यात येत असून उद्या 306 केंद्रावर लसीकरण होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे 18 वर्षवरील एकुण 22 लक्ष लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करायचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत 10 लक्ष 26 हजार लोकांना पहिला डोज देण्यात आला आहे. तर 3 लक्ष 94 हजार लोकांना दोन्ही डोज देण्यात आले आहे. या कवच कुंडल अभियान सप्ताह दरम्यान पहिल्या डोजचा कालावधी पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना प्राधान्याने दुसरा डोज देण्यात येणार असून जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या सप्ताहादरम्यान जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी लसीकरण सत्र आयोजित केल्या जाईल. गावस्तरीय समिती, तालुकास्तरीय समिती, मोठी गावे, प्रभाग इ. ठिकाणी सत्र आयोजित करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा तसेच दुर्गोत्सव मंडळ व स्वयंसेवी संस्था यांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे. आतापर्यंत जिल्ह्याला १४ लक्ष ८३ हजार डोजेस प्राप्त झाले असून सद्या जिल्हा स्तरावर १ लक्ष डोजेस उपलब्ध आहे. सप्ताह दरम्यान मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाला लस उपलब्ध होणार आहे. उद्या एकाच दिवशी 1 लक्ष लसीकरण करण्यासाठी ग्रामीण भागात 273 केंद्र आणि शहरी भागात 42 केंद्र असे एकूण 315 केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरीकांनी उद्या जास्तीत जास्त संख्येने लसीकरण करून घ्यावे. आपले लसीकरण पूर्ण करून स्वत:चे व इतरांचे कोविड आजारा पासून संरक्षण करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….