डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवालीत आमरण उपोषण सुरु केलं आहे. ‘सातारा संस्थानचा जीआर काढा, गॅझेटरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडीटी द्या, नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी’, असा आदेश काढावा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
दरम्यान, मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या भेटीला गेले आहेत. या बैठकीत सरकारने जरांगे पाटलांना नवीन आश्वासने दिली आहेत.
सरकारची नवीन पाच आश्वासने
- महिन्याभरात मराठा आरक्षण कक्ष सुरु करु
- नोंदी, प्रमाणपत्र वाटप, जातपडताळीसाठी 8 दिवसांत खाल हेल्पलाईन सुरु करु
- कुणबी प्रमाणपत्र वितरणासाठी एसओपी तयार करु
- आंदोलकांच्या वारसांना 15 दिवसांत अर्थसहाय्य करु
- हयगय केलेल्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करु
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
‘सरकार मराठा आरक्षणाबाबात सकारात्मक आहे. सरकारची भूमीका पारदर्शक आहे. आम्ही सकारात्मक काम करणारे लोक आहे. आम्ही समाजांना एकमेकांनासमोर आणून भांडत नाही’, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. तसेच ‘आम्ही समाजाच्या हिताचे निर्णय घेतो. परंतु त्याचवेळी संविधान आणि न्ययालयाच्या निर्णयाच्या आधिन राहून निर्णय घेतो’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस पुढे म्हणाले की, ‘एका समाजाचा काढून दुसऱ्या समाजाला द्यायचा असं कधीही केलं नाही, ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही, मराठा समाजाचाही त्या ठिकाणी समाधान करून देण्याकरिता सगळे निर्णय घेऊ परंतु ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. आता चर्चा झालेली आहे पुन्हा एकदा सांगतो न्यायालय, कायदा आणि संविधान याच्या चौकटीत बसून कोणताही निर्णय घेण्यास तयार आहोत’, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
मनोज जरांगे उपोषण मागे घेणार?
दरम्यान, काल झालेल्या दीड तासांच्या बैठकीत मनोज जरांगे यांनी हैदराबाद गॅझेट आणि सगेसोयऱ्यांच्या कुणबी दाखल्यांच्या मुद्द्यावरून विखे पाटलांवर प्रश्नांची सरबत्ती केली होती. ‘आम्ही सरकारला खूप वेळ दिला, आता आणखी वेळ देणार नाही,’ असं म्हणत जरांगे यांनी मसुदा लेखी स्वरूपात पाहिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. आता सरकारचा हा अधिकृत ड्राफ्ट समोर आल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आपले उपोषण मागे घेणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?