नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रयासवन येथे ओपन जीम सुरू करणार ; ‘फ्रीडम रन’ मध्ये सहभागी युवकांचा सत्कार व बक्षीस वितरण प्रसंगी पालकमंत्री भुमरे…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 2 ऑक्टोबर :- दैनंदिन व्यायामातून नागरिकांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी प्रयासवन येथे ओपन जीम व त्याव्यतिरिक्त इतर सुविधा आपण उपलब्ध करून देवू असे आश्वासन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज दिले.
स्वातंत्र्याच्या अमृत महात्सवानिमित्त नेहरू युवा केद्रातर्फे प्रयासवन येथे फ्रीडम रन चे आयोजन करण्यात आले होते. या रनमध्ये प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या युवक व युवतींना पालकमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी आ. दुष्यंत चतुर्वेदी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, अनिल ढेंगे, डॉ. विजय कावलकर, नितीन खर्चे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार इ. प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या मुलांमध्ये अजिंक्य गायकवाड, आवेश चौव्हाण, कुणाल कापडे, तर मुलींमध्ये उज्वला चामटकर, श्रुतीका सोनवणे व वैशाली टेकाम यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे या रन मध्ये निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी 10 कि.मी. अंतर धावून पुर्ण केल्याबद्दल त्यांचाही पालकमंत्री भुमरे यांनी सत्कार केला.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीदिनी त्यांचे आदर्शावर चालण्याचा व फिट इंडियाचा संदेश फ्रीडम रन ने दिला असल्याचे सांगितले. तर पोलीस अधिक्षक भुजबळ यांनी फ्रीडम रन सारख्या आदर्श कल्पनेत नवीन पीढीचे शिलेदार सहभागी असल्याचा सांगितले.
कार्यक्रमाचे शेवटी जिल्हाधिकारी येडगे यांनी उपस्थितांना फीट इंडियाचा संकल्प पुढे नेण्यासाठी शपथ दिली. उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी व्यक्त केले.
या फ्रीडम रन ची सुरूवात सकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हिरवी झेंडी दाखवून केली.
यावेळी प्रज्ञा निरकरी, मंगेश खुने, प्रमोद यादव, महेंद्र गुल्हाने, संदीप शीवराम, माणिक मेहरे, दिपक कुटे उपस्थित होते.