कृषिकन्यानी शेतकऱ्यांना दिले कलम निर्मितीचे प्रत्याक्षित
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
उमरखेड :
येथील नर्सरीत कृषिकन्यानी शेतकऱ्यांना कलम निर्मितीचे प्रत्यक्षित दिले. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत उमरखेड येथील कृषी महाविद्ालयातील सातव्या सत्रातील कृषिकन्यांनी हे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसमोर करून दाखवले. त्या मध्ये प्रामुख्याने आंबा कलम निर्मिती या विषयावर आंबा पिकाबांबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले .त्यात आंबा कलम निर्मितीवर अनुकूल हंगाम वातावरण वेगवेगळ्या पद्धती आंब्याचा जाती यावर प्रकाश टाकण्यात आला. यामध्ये कोविड १९ च्या त्रिसुत्री नियमांचे पालन करण्यात आले. या प्रात्यक्षिक कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य एस . के चींतले व प्राध्यापक वाय. एस.वकोडे ,प्रा. ए. बी.तमसेकर विषय तज्ञ प्राध्यापिका. यें. टी . चव्हाण कृषी कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.के.सपकाळ. यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्या पल्लवी मनवर, प्राजक्ता खंडारे , तेजेस्विनी धोंगडे , प्रियंका लोखंडे .हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.