उमरखेड येथे कृषिकन्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
उमरखेड :
उमरखेड येथील प्रगतशील शेतकरी यांच्या शेतामध्ये कृषिकन्या पल्लवी मनवर, तेजस्विनी धोंगडे, प्रियंका लोखंडे, प्राजक्ता खंदारे यांनी कामगंध सापळा आणि पिवळा चिकट सापळा यांचे प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सापळे पिकावर येत असलेल्या विविध कीटकांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरणार आहेत. पल्लवी मणवर , तेजस्विनी धोंगडे,प्रियंका लोखंडे, प्राजक्ता खंदारे ह्या उमरखेड येथिल कृषी महाविद्यालच्या शेवटचा वर्षाच्या विद्यार्थिनी असून ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत हा कार्यक्रम राबवला. त्यांनी पिवळा सेंच्युरी पेपर कडक खर्ड्यावर चिटकवून त्यास चिकट ग्रीस लावून पिवळा चिकट सापळा तयार केला. हा पिवळा चिकट सापळा सोयाबीन या पिकावर येत असलेल्या पांढरा माशीचा नियंत्रणासाठी उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी प्राचार्य एस.के चींताले, प्रा वाय. एस वाकोडे व कार्यक्रम अधिकारी प्रा. सपकाळ यांचे मार्गर्शन लाभले.