कृषी कन्येकडून कारखेड येथे बियाणे व टॅग-लेबल यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :७२४९४४४८८८
उमरखेड:
कृषी महाविद्यालय उमरखेड येथील सातव्या सत्रातील विद्यार्थी कृषीकन्या कोमल काळबांडे हीने ग्रामीण कृषी कार्यक्रमा अंतर्गत उमरखेड तालुक्यातील कारखेड येथील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या बियाण्याच्या टॅगबद्दल मार्गदर्शन केले.
मुलभूत बियाणे, पायाभूत बियाणे, प्रामाणिक बियाणे, सत्यप्रत बियाणे व त्यांचे महत्व पटवून सांगितले.त्यामधे असणारी बियाण्याची उगवण क्षमता,भौतिक शुद्धता, आनुवंशिक शुद्धतेची टक्केवारी इत्यादी तसेच त्यावर असलेली टॅग रंग याबद्दल महिती दिली विशेषतः हे बियाणे एखादया विद्यापीठातून किंवा एखाद्या शेतकऱ्यांच्या शेतातून त्यांचे उत्पादन घेऊ शकतो. याबद्दल शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना ग्रामस्थांना सविस्तर मारगदर्शन केले.यावेळी कृषी महाविद्यालय उमरखेडचे प्राचार्य. एस.के. चिंतले, प्रा.वाय.एस. वाकोडे, प्रा.वी. किरनापुरे,प्रा.वी.किनवटकर व ग्रामीण कृषि कार्यानुव कार्यक्रम अधिकारी तसेच विषतज्ञ (वनस्पतीशास्त्र) प्रा.आर.के. सपकाळ सर यांचे मार्गदर्शन लाभले.