पुरस्थितित पुलावरून मार्ग काढताना दोन युवक गेले वाहून ; काळी दौ. परिसरातील वसंतनगर येथील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
काळी दौ ते दिग्रस मार्गावर असलेल्या वसंत नगर येथील पुलावरून पाण्यातुन दुचाकी ने मार्ग काढताना दोन युवक वाहून गेल्याची घटना ६ सप्टेंबरच्या रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घटना घडली. ज्ञानेश्वर जाधव (२८), सुरेश महिंद्रे (२७) रा. साई ईजारा ता. महागाव असे वाहुन गेलेल्या युवकाचे नाव आहे.
आज सायंकळ पासून काळी (दौ) सह परीसरात संततधार पाऊस सुरुच आहे. त्यातच वसंत नगर वरील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते.

त्या पाण्यातुन दुचाकी क्रमांक एम. एच. २९ ए. व्ही. ००७४ काढण्याचे प्रयत्नात हे दोन्ही युवक वाहुन गेले आहे.
या बाबत दिग्रस पोलीस निरीक्षक सोनाजी आमले यांना माहिती मिळताच त्यांनी सहाय्यक उपनिरीक्षक गुणवंत गोटे व सहकाऱ्यांना घटना स्थळी रवाना करण्यात आले.वाहून गेलेल्या युवकापैकी एक युवक मृत्वस्थेत आढळून आल्याची माहिती प्राप्त झाली असून दुसऱ्या युवकाचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….