माणुसकीची भिंत तर्फे पोळा सण आगळा-वेगळा साजरा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
माणुसकीची भिंत पुसद यांच्या वतीने असोली (गौळ) येथील गोवंश मध्ये आगळावेगळा पोळा सण साजरा करण्यात आला.
23 मार्च 2021 ला भाटंबा परिसरातून कत्तलीच्या संशयावरून पुसद ग्रामीण पोलिसांनी 50 गाई (गोवंश) जप्त करून न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत नगर परिषद पुसद कोडवाड्याच्या स्वाधीन केले होते, कोंडवाड्याच्या अपुऱ्या व्यवस्थापनामुळे 50 गाई मधील 20 गाई मरण पावल्या, जिल्हा सत्र न्यायालयाने दिनांक 30 ऑगस्ट रोजी तीस गाई (गोवंशाचा) गोपाल कृष्ण गोरक्षन ट्रस्ट असोली या संस्थेच्या स्वाधीन करण्याचा निर्णय दिला, यासाठी शहरातील अनेक गोभक्तांनि व सामाजिक संघटने चे सहकार्य लाभले, या गोवंशाची प्रकृती अत्यंत नाजूक आहे,या गोवंशासाठी खाद्य म्हणून असोली गोरक्षण संस्थेने माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद ला संपर्क करून या गोवंश (गाई) करिता खाद्य म्हणून ढेप व चुनी ची व्यवस्था करण्याचे आव्हान केले,
माणुसकीची भिंत सदस्यांनी माणुसकीची भिंत व्हाट्सअप ग्रुप मधील सर्व सदस्यांना जमेल तशी मदत करण्याचे आव्हान करण्यात आले, अवघ्या दोन दिवसात 31 हजार 424 रुपये एवढी मदत जमा झाली.मदत करणारे दाते 1) माणुसकीची भिंत सदस्य तर्फे 2100/ 2) त्रिमूर्ती हार्डवेअर गादेवार भाऊ 1100/ 3)शुभनीती ग्रुप शुभदा नितीन नारखेडे₹1500/ 4)विजय विश्वकर्मा 1100/- 5)दीपक श्रीराम शिरमवार 501/- 6)सिद्धांत झुंजारे501/- 7) अश्विन चंद्रवंशी2000/- 8) संभाजीराव देशमुख1000/- 9) सुरज शिंदे 500/- 10) अनघा चक्करवार 500/- 11) अभिजीत दुबे501/- 12) अतुल व्यवहारे501/- 13) मनीष कोट्टवार 201/ 14) अमरदीप जयस्वाल1001/ 15) विनोदकुमार पणपालिया 500/ 16) s.j.गौ प्रेमी 1000/ 17) शशांक गावंडे 1100/ 18) राजेंद्र कदम 501/ 19) किशोर बोपीलववार 501/ 20) मिलिंद बोबडे 500/ 21) छायाताई खंदारे(पोलीस) 1000/ 22) गोरे मॅडम (क्षिरसागर) 1000/ 23) B.P.गौ प्रेमी 1000/ 24)आकाश बहादूर ठाकुर 201/ 25)किशोर साखरे 500/ 26)अविनाश भोजु राठोड 101/ 27)शाम जिरोनकर 500/ 28) संदीप चौधरी 500/ 29) दादा खापरे 1000/ 30)रमेश शामराव जाधव 300/ 31)S.L.गौ प्रेमी 500/ 32) विजय पेन्शनवर उमरखेड ₹501/ 33)रामभाऊ ठाकरे गुजरात
₹1111/ 34) साहील जयस्वाल 201/ 35) सौ. सविता मुडे 2000/ 36)गंगाधर पांडे 1000/ 37) गौरव चव्हाण 500/ 38) चंद्रकांत देशमुख ₹500/ 39) श्री पवन भाऊ पटेल ₹500/ 40) शिवप्रभा ट्रस्ट पुणे 1000/ 41) अनिता अनिल मोर ₹501/ एकुण 31424/ एवढी रक्कम जमा झाली.
ही सर्व रक्कम पोळा सणानिमित्य, “गोपाल कृष्ण गोरक्षन ट्रस्ट असोली” येथील गाईंना (गोवंशला) दोन महिने पुरेल एवढी ढेप चुरी देण्यात आली, पुरणपोळीचा नैवेद्य व तेथील सर्व कार्यकर्त्यांना पुरणपोळी, दूध-तूप,सार-भात चे जेवण देण्यात आले.यावेळेस माणुसकीच्या भिंतीच्या टीमने सर्व जनतेस गोपाल कृष्ण गोरक्षण ट्रस्टला मदत करण्याचे आव्हान केले या वेळेस दानकरते व माणुसकीची भिंत चे अध्यक्ष गजानन जाधव सचिव जगत रावल पंकजपाल महाराज परशराम नरवाडे दत्तात्रय जाधव अश्विन भाऊ चंद्रवंशी संभाजीराव देशमुख संजय आसोले श्री उमलाल रामधनी स्वप्नील सावके उपसरपंच सोहम नरवाडे कृष्णाराव नागठाणे आदित्य जाधव हिमांशू रावल व इतर मान्यवर उपस्थित होते.