ढाणकी येथील दत्त मंदिरात गुरु माते वर प्राणघातक हल्ला ; दोघांवर गुन्हा दाखल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
ढाणकी (प्रतिनिधी)
शहरांमध्ये आठशे वर्षापासून कार्यरत श्री दत्त मंदिर आहे या मंदिरामध्ये गुरु मातेवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे गुरुमाता गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार चालू आहे. परिसरात या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला जात असून आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राप्त माहितीनुसार गुरु माता अरूणाबाई गुरु दिगंबर बाबा अमृते हे गेल्या 16 वर्षापासून श्री दत्त देवस्थान मंदिरामध्ये पूजाचे काम करतात. गुरुमाता अरूणाबाई यांचे गुरु दिगंबर अमृते व मायबा आश्रमाचे कृष्णा महाराज यांच्या मध्ये मंदिरातील पूजे वरून आपसात वाद चालू होता यातील गुरु दिगंबर अमृते यांना खोटे आरोप करून मंदिराबाहेर केले. गुरूच्या आश्रमामध्ये गुरुमाता पूजेसाठी जात असतान आरोपी कृष्णा महाराज वय वर्ष 21 यांनी रागाच्या भरात गुरु मातेच्या डोक्याचे कपाळावर कुर्हाड मारली व आरोपी उत्तम जाधव वय वर्ष 60 यांनी गुरु मातेच्या तोंडावर समयी मारली त्यामुळे गुरु माता अरूणाबाई यांच्या तोंडावरील वरचे बाजूचे संपूर्ण दात पडले व ते गंभीररित्या जखमी अवस्थेत पडले त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुरु माते वर हल्ला करण्यात आला त्या पूर्वी गावातील काही व्यक्ती मंदिरात येऊन सीसीटीव्ही बंद करून कट्ट असल्याचा संशय भाविक व्यक्त करत आहे.
शासकीय रुग्णालय उमरखेड येथे उपचार घेत असताना जबानी रिपोर्ट वरून आरोपी नामे1) कृष्णा महाराज वय 21 वर्षे राहणार माय बा आश्रम दत्त मंदिर ढाणकी 2) उत्तम जाधव वय 60 वर्ष रा. पेवा तालुका हदगाव जिल्हा नांदेड यांच्यावर कलम 223/2021, कलम 326 भा द वि गुन्हा बिटरगाव पोलीस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आला असून पुढील तपास बिटरगाव पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायभाये यांच्या मार्गदर्शनात मोहन चाटे व रवी गीते पुढील तपास करत आहे