पीक अप वाहनाची दुचाकीस जोरदार धडक ; एकाची प्रकृती चिंताजनक तर एक किरकोळ जखमी ; महागाव येथील पुस नदी जवळील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
देशी दारूची वाहतूक करणाऱ्या पीक अप वाहनाने दुचाकीस्वारास जबर धडक दिल्याने दोघे जखमी झाल्याची घटना आज (ता.०५) रात्री साडे नऊच्या सुमारास महागाव येथील पुस नदी पुलाजवळ घडली आहे. विनोद शामराव सरदार(अं.४०) व सचिन सरदार दोघेही रा. कलगाव असे अपघातग्रस्तांची नावे असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या प्राप्त माहिती नुसार ,
आर्णी येथील एका ठोक दारू विक्रेत्याकडून महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जाते. वैद्य असलेल्या अनुज्ञप्ती धराकाकडून चिल्लर अवैध दारू विक्रेत्यांना घरपोच दारूच्या पेट्या पुरवल्या जातात. हा गोरखधंदा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. अवैधपणें दारूची विक्री वितरण करून पीक अप वाहन क्रमांक एमएच २९ एटी ०९४० ने महगाव येथून भरधाव वेगाने आर्णीच्या दिशेने निघाले.भरधाव पीक अप वाहन अनेक दुचाकी चालकांना कट मारून गेला त्यात अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.मात्र महागाव ते कलगाव दरम्यान पुस नदी जवळ कलगाव कडे जाणाऱ्या दुचाकी वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली.आणि वाहन परत विरूध्द दिशेने उमरखेड कडे पसार होण्याचा प्रयत्न केला.घटनेची माहिती मिळताच महागाव येथील काही तरुणांनी त्या अपघातग्रस्त वाहनाचा पाठलाग केला असता,महागाव येथील आठवडी बाजार येथे मोठ्या शिफातिने सदर वाहन सामाजिक कार्यकर्ते यांनी पकडला.घटनेची माहिती महागाव पोलिसांनी देत सदर अपघात ग्रस्त वाहन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.जखमी विनोद सरदार आणि सरदार यास महागाव येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश भवानकर, तेजेश नरवाडे , रियाज पारेख,संतोष पडूळकर, सूरज नरवाडे ,यांनी जखमीस महागाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.पुढील उपचारार्थ यवतमाळ येथील रुग्णालयात हलविण्यात असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर वाहनातील दारूच्या पेट्या वैद्य की अवैध याबाबत महागाव पोलीस कसून चौकशी करीत आहेत. वृत्तलीहेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.