दिग्रस येथील ५ युवक कन्हान नदीत बुडाले ; शोध कार्य युद्ध पातळीवर सुरू
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :-
जिल्ह्यातील दिग्रस येथील १३ युवक
नागपूर जिल्ह्यातील गाडेघाट येथे दर्शनासाठी गेले होते. यापैकी पाच युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू झाला झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी उघडकीस आल्याने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केल्या जात आहे. कन्हान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून युवकांचा शोध घेणे सुरू केले. मात्र,दुपार पर्यंत १ युवकाचा मृतदेह आढळल्याची सूत्रांची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद अरबाज ऊर्फ लकी (वय २२), अयाज बेग हफीज बेग (वय २०), मो. अनुअर मो. अल्फाज (वय १८), मो. सप्तहीन मो. इकबाल शेख (वय २१) व ख्वाजा बेग तबुस्सर बेग (वय १७) अशी मृतांची नावे आहेत. कन्हानपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या घाडेघाट येथील अम्माचा दर्गा धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
समोरून वाहत असलेल्या कन्हान नदीच्या पात्रात काही युवक अंघोळ करण्यासाठी गेले. तर काही युवक गाडीमध्ये आराम करीत होते. आंघोळ करीत असताना एक युवक पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी एका मागोमाग चार युवक गेले. मात्र, तेही वाहून गेले. उपस्थितांनी घटनेची माहिती कन्हान पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोताखोऱ्याच्या मदतीने युवकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.


शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..