महागाव शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले ; घरासमोरून दुचाकी लंपास ; रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
महागाव शहरातील प्रभाग ९ मधील एका घरासमोर उभी असलेली दुचाकी रात्री ११ च्या सुमारास अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी दुचाकी मालक अशोक सोनबा राजवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात महागाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रात्रीला होणाऱ्या चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पोलिसांच्या रात्रीची गस्त आणि कार्यप्रणालीवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अशोक सोनबा राजवाडे रा. महागाव हे नेहमी प्रमाणे घराबाहेरील अंगणात दुचाकी क्रमांक एम एच २९ इबी ३४९४ “लॉकबंद” करून ठेवली होती.मात्र रात्री ११ च्या सुमारास दुचाकी घरासमोर नसल्याचे कुटुंबाच्या निदर्शनास आले.त्यामुळे दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला मात्र दुचाकी आढळून आली नाही. सदर मोटरसायकल बजाज कंपनीची असून किंमत तीस हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.दुचाकी मालक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुुुन्हा दाखल केला आहेे .
महागाव शहरात चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली आहे . महागाव पोलीसांकडुन रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली.मात्र पोलीस प्रशासन हप्तेवारीत गुंग झाले आहेत.अवैध व्यवसायामुळे कंगाल झालेले गुंड चोरी करून वाम मार्गात पैसा टाकत आहेत. अश्या अनेक चोरीच्या घटना शहरात घडल्या मात्र पोलीस प्रशासाने कुठलाही चोरट्यांचा सुगावा लावता आला नाही.मुख्य बाजार पेठेसह गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे करणार असल्याची माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील अडकिने यांनी पॉलिटिक्स स्पेशल शी बोलताना सांगितले.