महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांचे अर्ज नोंदणी सुरू ; प्रमाणित बियाणे, पीक प्रात्यक्षिके, कृषी औजारे व सिंचन सुविधा साधने या घटकासाठी अर्ज आमंत्रित…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 25 ऑगस्ट :- सन २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत अन्नधान्य, पिके व गळीत धान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषी औजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
पीक प्रात्याक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषी सहाय्यकांशी संपर्क करून १० हे. क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी. शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी दि. ३० ऑगस्ट २०२१ ते दि.१० सप्टेंबर, २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
अन्नधान्य पिके व गळीतधान्य कार्यक्रमांतर्गत हरभरा कडधान्य व पोष्टिक तृणधान्य या पिकांचा यवतमाळ जिल्ह्यांमध्ये समावेष आहे. बियाण्यासाठी एकूण किंमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला २ हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.
पीक प्रात्यक्षिके –
पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे,जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार रु. २०००/- ते ४०००/- प्रती एकर मर्यादेत डिबीटी तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.


शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..