किनवट शहर व तालुका कॉंग्रेस कमिटी ; एकाच दिवशी चार कुटुंबियांचे आ. अमरनाथ राजूरकर यांनी केले सांत्वन…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर/किनवट (राजकिरण देशमुख) :- 8 ऑगस्ट रोजी कोविड व अन्य काही कारणाने मागील काही दिवसांत किनवट शहरातील चार प्रतिष्ठित व्यक्तींचे निधन झाले, त्यांच्या कुटुंबियांच्या घरी जावून विधान परिषदेचे प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर यांनी सांत्वन केले.
यावेळी आ. भीमराव केराम, जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती मा. संजय बेळगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
काँग्रेस सेवादलाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा.किशनराव किनवटकर, राष्ट्रवादीचे नेते प्रा. इंद्रसिंग राठोड, माजी शहराध्यक्ष मतीन कुंदन व माजी नगराध्यक्षा सुरेखा काळे या चार प्रमुख पदाधिकाऱ्यांचे अलीकडच्या काळात निधन झाले, किनवटकरांसाठी हा मोठा धक्क समजल्या जातो.
किनवट तालुक्याच्या दौऱ्यावर गेलेले विधान परिषद प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर यांनी या चारही कुटुंबियांच्या घरी भेट देवून त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.
या वेळी माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमाणीवार, के.मूर्ती, साजीद खान, नगरसेवक इम्रानखान, अभय महाजन, माजी तालुकाध्यक्ष नारायण सिडाम, शेख रतन चाँद, प्रभाकर नेम्माणीवार, इरफान मेमन, बाबू मेमन, सत्तार खिचे, शेख सर्फराज, चेतन किनवटकर, केतन किनवटकर, अनिल तिरमनवार, मनोज तिरमनवार, शेख शेहनाज, प्रवीण राठोड, सचिन राठोड, फारुख चौहान, लक्ष्मीपती तोडपल्लेवार, जवाद आलम, वसंत राठोड यांची उपस्थिती होती.