फुलसावंगीच्या रँचोचा हेलिकॉप्टर ट्रायल दरम्यान मृत्यू ; १५ ऑगस्ट ला लाँच करणार होता “मुन्ना हैलिकॉप्टर” ; बॅगलोरला होती ऑफर
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
फुलसावंगी येथील शे इस्माईल उर्फ मुन्ना शे.इब्राहिम(२४) याने चक्क हेलिकॉप्टर बनविले होते. तर मागील २ वर्षा पासून इस्माईल उर्फ मुन्ना ने हेलिकॉप्टर बनविण्यासाठी कष्ट घेत होता.हळूहळू त्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. मुन्ना हा वेल्डिंग काम करणारा प्रामाणिक कारागीर होता. त्याला एक भाऊ आणि एक बहीण मोठा भाऊ मुस्सवीर हा गॅस वेल्डर आहे. तर वडील घरीच असतात. इस्माईल उर्फ मुन्ना हा शे इब्राहिम यांचा द्वितीय चिरजिव आहे.

घरची परिस्थिती जेमतेम. इस्माईल हा वेल्डिंग काम करणारा असल्याने तो अलमारी,कुलर असे विविध उपकरणे बनवायचा . इस्माईल हा फक्त ८ वा वर्ग शिकलेला कष्टाळू मुलगा. पण एक दिवस त्याला काय माहीत आणि कसे सुचले त्याने चक्क हेलिकॉप्टर बनवायचे ठरवले आणि त्याच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी त्याचा प्रवास सुरु झाला. आणि हळूहळू एक एक पार्ट स्वतः तयार करू लागला. आणि २ वर्षाच्या यशस्वी प्रयत्नानंतर त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. हेलिकॉप्टर चे नामकरणही केले “मुन्ना हेलीकॉप्टर “.

१५ ऑगस्ट ला स्वातंत्र्यदिनी आपली कला जगासमोर मांडण्यासाठी त्याची जिद्द होती.त्यामुळे सध्या त्याची
रंगीत तालीम म्हणून रात्री त्याने बनविलेल्या हेलिकॉप्टर ची ट्रायल घेण्यास सुरुवात केली. जमिनीवर इंजिन सुरू केले इंजिन ७५० एम्पियर वर फिरत होते. सर्व व्यवस्थित सुरू होते.दरम्यान काही बिघाड झाल्याने त्याच्या लक्षात आले. हेलिकॉप्टर सुरक्षित लॅड केले.आणि मागील बाजूचा बॅलेंसिंग फॅन नादुरुस्त वाटल्याने त्याकडे लक्ष वेधले.पण अचानक हेलिकॉप्टरचा मागचा फॅन तुटला आणि त्यामुळे मुख्य फॅनला येऊन धडकला आणि तो फॅन इस्माईल च्या डोक्यात लागला आणि पाहता पाहता सर्व स्वप्न भंग झाले आणि डोक्यावर फॅन लागल्याने इस्माईल चा मृत्यू झाला .

त्याचे स्वप्न होते की एक दिवस तो त्याच्या आणि त्याच्या गावाला जगात नाव करायचे पण इस्माईल चे स्वप्न अर्धवटच राहिले
आणि फुलसावंगीच्या रँचोचा हेलिकॉप्टर ट्रायल दरम्यान मृत्यू झाला .सर्व कागदोपत्री पूर्तता करून अधिकृत हेलिकॉप्टर करण्यांचा प्रयत्नही सुरु होते हे विशेष
******

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….