पैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- वडिलोपार्जित शेती विक्रीतून येणाऱ्या पैशाच्या वाटणीवरून घडली हत्या. वडिलांच्या शेती विक्रीतील चार लाखा पैकी 2 लाख मिळाले उर्वरित दोन लाखासाठी नेहमीच
फिर्यादी सरदार खान व त्याची बहीण यांच्यात वाद-विवाद होत असल्याची तक्रार मृतकाचे वडिलांनी दिली. त्यावरून सय्यद असलम उर्फ परिंदा सय्यद सलीम व मन्या उर्फ ओमकार संतोष पवार यांनी येऊन इम्तियाज ला जीवाने ठार केले. तसेच त्यांना 5 अन्य आरोपीयांनी कट रचून मदत केली अशी तक्रार दिल्यावरून वसंत नगर पोलिस स्टेशन पुसद येथे सातही आरोपीतांवर भादवि चे कलम 302, 109, 120 ब, 34 तसेच आर्म एक्ट 3 (25) 4 (27) यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे पुढील तपास करीत आहे. तसेच यातील ताब्यात घेण्यात आलेला बालगुन्हेगार मन्या उर्फ ओमकार संतोष पवार यास बाल न्यायालय यवतमाळ येथे पाठविण्यात आले अटक आरोपी फैजल अली खान मुजाहत अली खान, शेख हाफिज शेख कादर यांना पुसद येथील न्यायिक दंडाधिकारी पी आर फुलारी यांच्या न्यायालयात हजर करून या प्रकरणातील तपासासाठी पोलिस कस्टडी रिमांड ची मागणी केली असता विद्यमान न्यायालयाने 30 जुलैपर्यंत पोलिस कस्टडी मंजूर केली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….