यवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- यवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ करिता ४ लाख ६७ हजार २१ शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती सुरक्षा कवच म्हणून पीक विमा उतरविला होता.या हंगामात नैसर्गिक अतिवृष्टी व ओला दुष्काळ यामुळे सगळी मुख्य पिके वाया गेली.यामुळे शेतकरी उध्वस्त झाले.सुरक्षा कवच म्हणून उतरविलेला पीक विमा तरी मदत देईल ही शेतकऱ्यांची अपेक्षा होती.पण जिल्यातील ६१ हजार शेतकरीच यासाठी पात्र झालेली आहेत.सोयाबीन,कापूस, तूर, उडीद, मूग इत्यादी पिकांसाठी पीक विमा उतरविनाऱ्याची संख्या लाखोंच्या घरात आहे.पण पीक विमा कंपनीने भोळ्या शेतकऱ्यांची फसवणूक करून बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला.पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची जबरदस्त लूट करून फसवणूक केलेली आहे.सरकारने शेतकऱ्याची दैंनिय अवस्था पीक विमा कंपनीने केलेली आहे.सादर विषयावर मा. मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर सदर विषय निकाली काढावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलनाचा पवित्रा हाती घेईल असे या निवेदन नुमुद केले आहे. सदर निवेदनावर संदीप लांडे तालुका अध्यक्ष,रवी सूर्य तालुका उपाध्यक्ष,आकाश रहाटे तालुका अध्यक्ष मनविसे,गोपाल चव्हाण शहर अध्यक्ष,अजित रोडे शहर उपाध्यक्ष,युवराज भोसले तालुका उपाध्यक्ष,संतोष टाकरस तालुका उपाध्यक्ष,आश्विन चिरडे,निकित पवार,सागर चिंतावार,शुभम जामकर,अमोल कवडे इत्यादींच्या सह्या आहेत…