पुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथील वाशिम रोड असलेल्या हॉटेल जम-जम समोर मोटार सायकल वर आलेल्या दोन अज्ञात इसमानी रोड वर उभ्या असलेल्या तरुणावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. त्या गोळ्या डोक्यात लागल्या मुळे तरुणाचा मृत्यु झाला.ही घटना आज दुपारी २ च्या सुमारास घडली आहे. इमतियाज असे मृतक तरुणाचे नाव असल्याचे प्रथमदर्शी माहिती समोर आली आहे.
अज्ञात माथेफिरू गुंडांनी तरुणावर गोळीबार केल्यानंतर तरुणास लगेच उपचाराकरिता पुसद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची माहिती आहे.वसंतनगर पोलीस कार्यक्षेत्रात येणारे हे ठिकाण नेहमीच वादात असते.या अगोदर देखील असल्या गंभीर गुन्हेगारीचे प्रकार घडलेले आहेत. घटनास्थळी पोलीस हजर झाले असून पुढील तपास वसंतनगर पोलीस करत आहे.


शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..