बकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- शाहीन बाग कमेटी पुसद व मुसलीम समाज , बकरीत ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आला. सादर अशाप्रकारे आहे , बकरी ईद ( ईद – उल – अजहा) हे इस्लाम धर्माची व मुस्लमानाची महत्त्वाची व दुसरी मोठी ईद आहे . COVID – 19 नियमानुसार प्रशासनाने ईदगाह कमोटीस नोटीस दिले आहे की ईदगाह वर ईद – उल – अजहा ची नमाज अदा करु नये .ज्या प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय / प्रशासकीय धरणे आंदोलन वगैरे होत आहे तर पवित्र नमाजासाठी जर लोक कोविड १९ सर्व नियम पाइन उपस्थित राहिल्यास आपणास काही अडचण नसावी या बाबत आपण साहेबांनी थोडासा विचार केल्यास नमाज अदा होऊ शकते तरी ही विनंती आहे की , बकरी ईद ( ईद – उल – अजहा ) हे इस्लाम धर्माची व मुस्लमानाची महत्त्वाची व दुसरी मोठी ईद असून त्यामूळे ईदगाहवर २०० ते ५०० लोकांना ईद – उल – अजहा ची नमाज कोविड -१ ९ सर्व नियम पाडून अदा करण्याची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी मा.उपविभागीय अधिकारी, पुसद यांच्या मार्फत श्री.उध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना करण्यात आली. निवेदन देते वेळेस खान मोहम्मद खान सनी, अतिकोद्दिन खतिब, एजाज अहेमदुल्लाह खान,अमजद खान, सैय्यद ईश्तीयाक, मिर्झा आदिल बेग, मतीन खान, मोहम्मद ईसराईल (गुड्डू), जब्बार लाखे, फिरोज खान व अन्य उपस्थित होते..