पावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :-
यवतमाळ जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून सर्वत्र संततधार पावसाची रिपरिप सुरू आहे .त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरण,प्रकल्प,आणि तलाव पूर्णपणे भरण्याच्या दिशेने आहे.त्यामुळे तिथे बघ्याची गर्दी होत असल्याने जीवितहानी होण्याच्या घटना घडत असल्याने जिल्ह्यातील विविध धरण, तलाव, आणि प्रकल्प प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे.त्या बाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेश काढले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील
उमरखेड तालुका सिमेवर वसलेल्या सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत आहे. मान्सून कालावधीत धरण, तलाव, धबधबा मधील “ओव्हर फ्लो” दृश्य पाहण्यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी केल्या जात आहे. मागील पावसाळ्यात सहस्त्रकुंड धबधबा “ओव्हर फ्लो” पाहण्यासाठी गेलेल्या पती-पत्नी दाम्पत्याची तोल गेल्यामुळे मृत्यु झाला होता होता. तसेच बाभुळगाव परिसरात बेंबळा प्रकल्प येथे १ व्यक्तीचा मृत्यु व निळोणा धरण यवतमाळ येथे २ व्यक्तींचा मृत्यु झाला होता. अशा प्रकारच्या घटना यावर्षी होवू नये याकरीता जिल्हयातील मोठे व मध्यम प्रकल्प तसेच सहस्त्रकुंड धबधबा परिसर, बेंबळा प्रकल्प बाभुळगाव व निळोणा धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर क्षेत्रात प्रकल्पाचे अधिकारी कर्मचारी तसेच शोध बचाव पथक याशिवाय इतरांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्यात आले आहे .आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम नुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.