महागाव येथे कोविड योद्धा सत्कार सोहळा ; आरोग्य विभाग,पोलिसविभाग व सफाई कामगारांचा गौरव
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्य शिवसेना व युवसेनेच्या वतीने कोरोनायोद्धाचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ह्या सत्कार सोहळ्याचे प्रमुख अतिथी सपोनि बालाजी शेंगेपल्लु, कार्यक्रमाचे अध्यक्ष आरोग्य विभातील डाक्टर नखाते, कार्यक्रमाचे उदघाटक जिल्हा परिषद सदस्य बी एन चव्हाण,शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख सुदाम खंदारे व उमरखेड तालुका संघठिका सुनीता देशमुख,महागाव तालुका संघटक रवींद्र भारती,दत्तराव चिंचोलकर, अमोल चिकने,अशोक तुमवार ह्यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजक युवासेनेचे जिल्हा प्रमुख विशाल पांडे ह्यानी प्रास्ताविक दिले.
विशाल पांडे आपल्या प्रस्ताविकेत म्हणाले की
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांची शिकवण आहे ८० टक्के समाजकारण व २० टक्के प्रतिशत राजकारण हीच प्रेरणा आम्ही अंगिकारली आहे. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणारे योद्धा म्हणजे कोरोना योद्धा.
कोरोना विरुद्ध लढाई जिंकण्यासाठी समाजातील अनेक घटक एकत्र येऊन कार्य करीत आहे. त्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आरोग्य विभाग हा विशेष कोरोना योद्धा आहे. आरोग्य विभागाने कोरोनावर उपचार करण्यासाठी स्वतःची व कुटुंबाची पर्वा केली नाही . ते दिवस रात्र कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त आहेत .दिवस-रात्र सर्वत्र बंदोबस्त ठेवून पोलिसांनी आपले काम अगदी व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे केले कोरोना रुग्ण सापडलेला परिसर स्वच्छ निर्जंतुक करण्याची जबाबदारी सफाई कर्मचाऱ्यांची होती ती जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे निभावली . या सर्व कोरोना योध्यानचे कार्य सदैव स्मरणात ठेवा कारण त्यांच्यामुळे आपण उद्या मोकळा श्वास घेत आहोत . या कोरोनाच्या संकटात कोरोना योद्ध्यांनी आपल्यावर केलेल्या उपकारांची परतफेड आपण करू शकणार नाहीत.”
युवासेनेतर्फे केलेला हा स्तुत्य उपक्रम आहे.अश्या कार्यक्रमामुळे पोलिसांचाही मनोबल वाढतो.महागाव येथील जनतेनी नेहमी आम्हाला सहकार्य केले असल्याचे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लु यांनी मत व्यक्त केले.
जिल्हा परिषद सदस्य बी एन चव्हाण ह्यांनी ही कोरोना योद्धाचे आभार मानले आणि युवसेनेच्या व शिवसेनेच्या उपक्रमाचे कौतुक केले.डॉक्टर नखाते मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की जेव्हा कोरोनाच्या पहिल्या लाटेने आपल्याकडे धाव घेतली तेव्हा हा आजार आपल्या सगळ्यांसाठी नवा होता तरीही आम्ही आपल्या कार्यासाठी सज्ज होतो आणि पुढे ही राहू
शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे ह्यानी आरोग्य,पोलीस व नगर पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांचे कौतुक करत म्हणाले की सगळ्यांनी खूप सहकार्य केले आहे.
शिवसेनेचे महागाव शहर प्रमुख राजू राठोड ह्यांनी समारोप घेऊन कार्यक्रमामागील भूमिका मांडली.
शिवसेना महिला आघाडीच्या महागाव शहर प्रमुख व पोलिसवाला वेब न्यूज च्या जिल्हा प्रतिनिधी केतकी विशाल पांडे ह्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
माजी उपजिल्हा प्रमुख सुदाम खंदारे म्हणाले की कोरोना योध्दे देशाचे खरे हिरो आहेत.
ह्यावेळेस युवासेनेचे राम तम्बाखे, ऋषिकेश बलखंडी,सुमित गोविंदवाड,सॅम कदम,मारुती डोरले, प्रविण कोकरे ,ऋषिकेश वाघमारे, दिनेश ठाकरे ,सोनू इंगोले ,बंटी गिरी, निलेश पानपट्टे ,गजानन गाडे, रोहन देशमुख,गजानन शिंदे ह्यांच सहकार्य लाभले.