बहुजन मुक्ती पार्टीचे “धक्का मारो” अंदोलन 👉🏼 पेट्रोल, डिझेल,गँस, खाद्यतेल विजबिल महागाई विरोधात
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅस खाद्यतेल व महागाई धोरणाच्या विरोधात व वीज बिल माफ करा यासाठी आज संपूर्ण राज्यभर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयावर धक्का मारो आंदोलन करण्यात आले महागाव तालुक्यातील विविध सामाजिक संघटना व बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोटर सायकलला धक्का मारत शिवभीम चौक ते तहसील कार्यालयापर्यंत धक्का मारो आंदोलन करण्यात आले कोरोनाच्या काळात अनेकांच्या हातातून रोजगार हिरावला गेला आहे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आणि त्यातच खाद्यतेल पेट्रोल डिझेल गॅस याचे मोठ्या प्रमाणात भाव वाढल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे सोबतच घरगुती विज बिल मोठ्या प्रमाणात आले रोजगार नसल्याने वीज बिल भरायचे कुठून असा प्रश्न सामान्य जनते समोर उभा झाला आहे वाढती महागाई कमी करावी पेट्रोल-डिझेल गॅसचे भाव कमी करून वीज बिल माफ करावे यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने महागाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी विविध सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे उमरखेड विधानसभा प्रभारी किशोर नगारे हिंगोली लोकसभा प्रभारी वर्षाताई देवसरकर प्रमोद जाधव समाधान पंडागळे रमेश नलावडे रमेश कांबळे राहुल गायकवाड संतोष ढगे विनोद बनसोडे बाबू जाधव शंकर भगत रमेश गोरे जयशिल कांबळे ऋषभ हटकर पदाधिकारी उपस्थित होते

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….