भोजला, वनवारला, रंभा परिसरात अतिवृष्टी,शेतकऱ्याचे अतोनात नुसकान
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :
नुकत्याच झालेल्या एक तास ढगफुटी मुळे भोजला रंभा वनवारला वडवाळ परिसरात शेतातील पाणी नाल्यावर तीन ते चार फूट उंच वाहत होते तसेच या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्यामुळे भोजला वनवराला रस्ता बंद होता.शेल खुर्द येथील नाला एक मीटर पर्यंत खचुन रत्याची वाताहात होऊन पुल सुध्दा खचला आहे. पहिल्या च पावसाळ्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आजुन पुर्ण पावसाळा बाकी आहे. त्यामुळे पुल कधीही वाहुन जाऊ शकते. यावर जाण्यासाठी रंभा पिंपळगाव वनवराला पुसधरण या गांवात जाण्यासाठी मार्ग आहे नागरिकाची गैरसोय होऊ नये
प्रशासनाने त्वरित रस्तादुरुस्ती चे काम हाती व्हावे अशी जनतेची मागणी आहे तसेच ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेताची बांध फोडून जमीन खरडली शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने शेतीसाठी तयार झालेली जमीन शेतकऱ्याला पुन्हा तयार करावी लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्याचे पहिल्याच पावसात अतोनात नुकसान झाले याची पाहणी करुन महसूल प्रशासनाने नुसकान भरपाई ची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.