नळाचे पाणी सोडण्यात अनियमितता
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून नदीच्या पात्रात पाणी साठा वाढला आहे. जलशुद्धीकरण केंद्राच्या जॅकवेल मध्ये पुराचे पाणी व कचरा साचत असल्याने तसेच पाऊस व वादळी हवेमुळे नियमित विद्युत पुरवठा खंडीत होत आहे त्यामुळे शुद्ध झालेले पाणी साठवण्याच्या टाक्यांमध्ये पुरेसा पाणी साठा उपलब्ध नसल्याचे पुसद नगर परिषद पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे. शहराला होणारा दैनंदिन पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक खंडीत झाले असून पुसद नगर परिषद पाणी पुरवठा विभागातर्फे नळाचे पाणी केव्हा येणार आहे त्याचा मेसेज नगरसेवकांना दिला जातो आणि हे नगरसेवक नागरिकांना कळवतात परंतु याही वेळेत नळाला पाणी येत नाही त्यामुळे जनतेला त्रास होत आहे. मागील काही दिवसापासून पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे महिलांना रात्री उशिरा किंवा भल्या पहाटे पर्यंत जागरण करावे लागते. वारंवार होणाऱ्या अडचणीवर नगरपालिकेने उपाय योजना करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.