ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे तिन तालुक्याचा संपर्क तुटला ; गुंज येथील पुलावरून पाणी ; चार तासापासून वाहतूक ठप्प ;
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
महागाव तालुक्यातील गुंज बस स्थानकावरील प्रगतीपथावर असलेल्या पुलाचे काम सबंधित ठेकेदाराने अर्धवट सोडून दिल्याने सकाळपासून संतधार कोसळणाऱ्या पावसाच्या सरिने तीन तालुक्याचा संपर्क तुटला आहे. महागाव , पुसद,माहूर, या तालुक्याचा संपर्क तुटला असून तब्बल चार तासापासून वाहतूक खोळंबली होती.अर्धवट पुलाच्या कामाने पुलानजीक असलेल्या दुकान आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
गुंज येथील पुलाच्या अर्धवट कामाने पावसाळ्यात मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने स्थानिक ग्रामपंचायत कडून अर्धवट पुलाची तक्रार सार्वजनिक बांधकामाची तक्रार करण्यात आली होती.मात्र संबंधित प्रशासनाने तक्रार बेदखल करून ठेकेदाराला पाठीशी घातले आहे. महागाव तालुक्यात सकाळ पासून कोसळणाऱ्या पावसाने गुंज पुलावरून पाणी वाहू लागले.अर्धवट पुलाच्या कामावर दोन्ही बाजूने मातीचा बांध टाकण्यात आल्याने पुराचे पाणी लगतच्या दुकान आणि घरात शिरल्याने पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.तर पुसद , महागाव , आणि माहूर तालुक्यातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे.पुराच्या पाण्यामुळे तब्बल ४ तासापासून वाहतूक खोळंबली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने स्थानिक प्रश्नाकडे अधिकारी दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.अर्धवट पुलामुळे झालेली नुकसान भरपाई देवून संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
अर्धवट पुलाची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती.परंतु अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मोठ्या नुकसानीला समोर जावे लागले.झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी. व दोषींवर कार्यवाही करण्यात यावी.
प्रमोद जाधव
ग्रा. पं. सदस्य ,गुंज

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….