बिरसा मुंडा पुण्यतिथी निमित्य माणुसकीची भिंत कडून अभिवादन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
आज जननायक बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त उपजिल्हा रुग्णालय माणुसकीची भिंत मदत केंद्र येथे प्रथम बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे नाना बेले पंकज पाल महाराज मारुती भस्मे नगरसेवक शाकिब शहा सामाजिक कार्यकर्ते संतोष भेंडे दिलीप भाऊ खैरे यांच्या हस्ते पूजन करून फळे व खिचडी वाटप करण्यात आली स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी ब्रिटीशांविरुद्ध लढताना आपल्या प्राणाची आहुती दिली त्यातील एक अग्रगण्य नाव म्हणजे बिरसा मुंडा आपल्या हजारो आदिवासी बांधव यांना सोबत घेऊन बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा उभा केला ग्रामीण भागातील लोकांमध्ये स्वातंत्र्याची ऊर्मी जागृत केले भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजातील एकमेव नेतृत्व म्हणजे बिरसा मुंडाझारखंड ओरिसा मध्य प्रदेश बिहार पश्चिम बंगाल छत्तीसगड या राज्यांत यांच्या नावाने अनेक संस्था आणि कल्याणकारी योजना सुरू करण्यात आलेले आहेत त्यांनी दिलेली धर्माचे व्यसनमुक्तीची शिकवण आजही कितीतरी आदिवासी बांधव भक्तिभावाने पाळतात या कार्यक्रमास नाना बेले पंकज पाल महाराज संतोष भेंडे मारुती भस्मे शाकिब शहा दत्तात्रेय जाधव संजय बुरकुले माणुसकीच्या भिंतीचे गजानन जाधव जगत रावल संतोष गावडे दीपक घाडगे चौरे साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते.