24 तासात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे दुप्पट ; जिल्हयात 81 कोरोनामुक्त, 27 पॉझेटिव्ह….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 7 जून :-
गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण दुप्पट आहे. जिल्ह्यात 27 जण पॉझेटिव्ह तर 81 जण कोरोनामुक्त झाले असून आज एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही हे विषेश.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 2963 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 27 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2936 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 763 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 313 तर गृह विलगीकरणात 450 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72419 झाली आहे. 24 तासात 81 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 69877 आहे. आतापर्यत जिल्ह्यात एकूण 1779 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 50 हजार 721 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 77 हजार 523 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.13 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 091 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.
पॉझेटिव्ह आलेल्या 27 जणांमध्ये 18 पुरुष आणि 9 महिला आहेत. यात दारव्हा येथील 6, दिग्रस येथील 5, मारेगाव येथील 1, पांढरकवडा 1, पुसद येथील 9, राळेगाव 1, वणी येथील 1, यवतमाळ येथील 3 रुग्ण आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2071 बेड उपलब्ध
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 208 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2071 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 79 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 498 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 75 रुग्णांसाठी उपयोगात तर 451 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 54 उपयोगात तर 1122 बेड शिल्लक आहेत.

सरपंच पदाच्या सुधारित आरक्षणाची सोडत ९ सप्टेंबरला…
मागण्या मान्य होईपर्यंत उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटलांचा नकार; पाणी अन् सलाईनही बंद, म्हणाले ‘जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत…’
अटी शर्तींसह महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या राजघाटावरच होणार माजी PM मनमोहन सिंग यांचे स्मारक…
‘डीजे’चे स्तोम लोकसहभागातून कमी करू; गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करा : मुख्यमंत्री फडणवीस…
संजय राऊतांवर तुरुंगात विषप्रयोग झाला? राहुल गांधींमुळे मी….; राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ, काय घडलं?
NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा…