महागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागांव :-
विविध घोषणा चा जोरावर भाजप सरकार सत्तेवर आले. परंतु दिलेले आश्वासन पाळले जात नसल्याने महागांव तालुका काँग्रेस कमिटी चा वतीने सोमवारला आंदोलन करुन भाजप सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. पेट्रोल डिझेल आणि गॅसचा वाढत्या दराचा निषेध करण्यासाठी महागांव येथील मे. के. एन भिसे पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आले.
महागांव तालुका कॉग्रेस कमेटीचा वतीने पेट्रोल पंपावर ग्राहकांना चाँकलेट वाटुन पेट्रोल डिझेल आणि गॅसचा वाढत्या दराचा निषेध करण्यात आला. पेट्रोल डिझेल दरवाढीमध्ये ग्राहकांची फसवणूक होत आहे.
खोटा घोषणा चा आधारावर सरकार बेजबाबदारपणे वागत असल्याने नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे.
पेट्रोल डिझेल आणि गॅसचा वाढत्या दरवाढीमुळे सर्वच वस्तु महागल्या आहेत.
तरी सहा वर्षाखालील दर स्थिर ठेवुन दिलासा द्यावा व महागाईला आळा घालावा अशी मागणी महागांव तालुका काँग्रेस कमिटी चा वतीने करण्यात आली यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस शैलेश कोपरकर, वनमालाताई राठोड, मालाताई देशमुख, महेंद्र कावळे, समाधान ठाकरे, देवसरकर, बाळु येनकर, अतुल शिंदे, शे कासम शे लाल, महेबुब खा पठाण, सुनिल भरवाडे, रजत खाडे, छाया वाघमारे, आशा भरवाडे, जयश्री नरवाडे , चंदा पाईकराव उपस्थित होते.