माहूर येथे रामगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न ; शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकीरण देशमुख) :- छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त स्वराज्य स्थापना दिन म्हणून माहूर येथील शिवभक्तांनी येथील रामगड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा अभिषेक करून पुजन करून अभिवादन करून शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. माहूर शहरातील दत्त चौकात छत्रपती शिवरायच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.ढोलताशाच्या गजरात रामगडाकडे या प्रतिमेचे पालखीतून मिरवणूक काढून गडावर घेऊन जाण्यात आली . गडावर शिवप्रतिमेचे दुग्धाभिषेक करून स्नान घालून पुजन करण्यात आले. जय जिजाऊ जय शिवराय च्या गजरात रामगड किल्ला परिसर दणाणून गेला. त्यानंतर छत्रपती शिवरायांची पालखी ढोल ताशाच्या गजरात माहूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आणण्यात आली चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौक नामफलकाचे पूजन व प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, स्वराज्य स्थापना दिनाचा विजय असो अशा गगनभेदी गर्जना देत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तानूबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष जयकुमार अडकीने,किसान ब्रिगेड चे अविनाश टनमने,संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष विशाल पाटील शिंदे,बाला पाटील टनमने,प्रसाद चौधरी,विनोद सूर्यवंशी, अमोल कदम हडसनीकर,अमोल जाधव, हडसनीकर,विजय जाधव, प्रसाद चौधरी, ओम टनमने,सोनू चौधरी, कुणाल राठोड, केशव जाधव, शुभम जाधव, सौरभ भिसे, शुभम नागपुरे, ऋषिकेश खंदरे,गणेश वाडेकर, गणेश टनमने, वैभव जाधव,योगेश गावंडे, ऋषिकेश गिरी,ज्ञानेश्वर राठोड,विधान अंकुळणेकर,रमेश जाधव,केशव जाधव आदींसह शिवप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.


माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….