अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्य ठार ; मृतक महागाव तालुक्यातील
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९७३७८८६७७७
महागाव :
उमरखेड येथे नातूला पाहण्यासाठी जात असलेल्या दाम्पत्याच्या दुचाकिस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघेही जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना महागाव तालुक्यातील मुडाणा ते बिजोरा दम्यान राष्ट्रीय महामार्गावर आज (ता .६) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली आहे. मोहन भागोजी टेकाळे (७३),अनुसायाबाई भागोजी टेकाळे ( ७०) रा. सवना असे मृतकाचे नाव आहे.
उमरखेड येथे सुनबाई ची प्रसूती झाल्याने नातू पाहण्यासाठी दोघेही सवना येथून सकाळी उमरखेड कडे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच २९ बीजे ३८०६ ने निघाले. मुडाणा ते बीजोरा दरम्यान रिठे यांच्या शेताजवळ समोर विरुध्द दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीस जबर धडक दिली.त्यात दोघेही जागीच गतप्राण झाले.ही धडक एवढी भयंकर होती की दोन्ही मृतकाचे शरीर छिन्न विच्छिन्न झाले.घटनेची माहिती महागाव पोलिसांना देताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी हजर झाला.पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर नाकेबंदी करून त्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु अपघातग्रस्त वाहन मिळून आले नाही.पोलिसांनी दोन्ही प्रेत ताब्यात घेवून पांचनामा केला असून सवना येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस, यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार शरद येडतकर ,नारायण पवार, गजानन राठोड हे करीत आहेत.