यवतमाळ जिल्ह्यात “ब्रेक दि चेन” अंतर्गत आस्थापना वेळेत सुधारणा ; त्रीसुत्री नियमाचे पालन करणे अनिवार्य ; जिल्हाधिकारी यांचे आदेश
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
यवतमाळ जिल्ह्यात पॉझिटीव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहे.त्याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नवीन आदेश आज ( ता.३१मे) जारी केला आहे.सदर आदेश हा २ मे पासून लागू राहणार असल्याचे नमूद करण्यात आले असून १ मे पर्यंत जुनाच आदेश लागू राहणार आहे .
दिनांक ०२ जून, २०२१ च्या सकाळी ७.०० वाजेपासून ते दिनांक १५ जून २०२१ च्या सकाळी ७.०० वाजेपर्यंत पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात करण्यात आली आहे.
ते खालील प्रमाणे :
१. सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई इ. खाद्य पदार्थाची दुकाने (ज्यामध्ये चिकन, मटन, मच्छी आणि अंडयांची दुकाने) आठवडयाची सातही दिवस सकाळी ७.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
२. अत्यावश्यक सेवेत मोडत नाहीत अशी एकल दुकाने व जी दुकाने शॉपींग सेंटर किंवा मॉल मध्ये नाही अशी दुकाने सोमवार ते शुक्रवार पावेतो सकाळी ७.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात येत आहे. मात्र सदर दूकाने शनिवारी व रविवारी बंद ठेवावी लागणार आहे.
३. अत्यावश्यक व इतर सेवेंच्या आस्थापना धारकांनी दुकानात नागरिकांची होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त होम डिलेव्हरीव्दारे वस्तूंचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे लागणार आहे.. त्यादृष्टीने आस्थापना धारकांनी स्वतःचे व्हॉटसअॅप नंबर दुकानासमोर प्रसिध्द करून व्हॉटसअॅप ग्रुप व्दारे याबाबत प्रसिध्दी देण्यास अनुमती देण्यात आली आहे. तसेच आस्थापना धारक ग्राहकांचे व्हॉटसअॅप नंबर/मोबाईल नंबर घेऊन त्यांना घरपोच वस्तू पुरवठा करण्यास प्राधान्य देता येईल.
५. अत्यावश्यक व इतर वस्तू/सेवा पुरविणा-या आस्थापना चालक व त्यामधील सर्व कर्मचारी तसेच होम डिलेव्हरी व्दारे वस्तू/सेवा देणारे कर्मचारी यांनी लसीकरण करणे अथवा त्यांच्याकडे कोविड चाचणी निगेटीव्ह असल्याबाबतचा अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. कोविड चाचणी अहवाल हा अहवालाच्या दिनांकापासून १५ दिवसांसाठी वैध राहील. लसीकरण न केल्याचे किंवा वरील मुदतीतील कोविड निगेटीव्ह अहवाल नसल्यास शासकीय पथाकाव्दारे पहिल्या वेळेस रु. १००/- व त्यानंतर प्रत्येक वेळेस रु. २००/- दंड आकारण्यात येईल.
६. मुभा देण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये दुकान मालक/ कामगार व ग्राहक यांनी मास्क लावणे, सामाजिक अंतर,सॉनिटायझर किंवा हॅन्डवॉशने नियमित हाताची स्वच्छता इ. कोविंड त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. सदरचे पालन न केल्याचे आढळून आल्यास संबंधित आस्थापना धारक यांचेवर पहिल्यांदा रु. ५०००/- दंड व पुन्हा आढळून आल्यास रु. १०,०००/- दंड आकारण्यात येईल याची नोंद घ्यावी.
७. अत्यावश्यक व इतर सेवाच्या मुभा देण्यात आलेल्या दुकानाव्यतीरिक्त इतर आस्थापना सुरु असल्यास तसेच अत्यावश्यक व इतर सेवेतील दुकाने दिलेल्या वेळेनंतर नियमांचा भंग करून उघडले असल्यास त्यांचेवर रु. ५०,०००/ (रु.पन्नास हजार) दंड आकारण्यात येईल व सदरील आस्थापना कोवीड-१९ च्या आजाराची अधीसुचना अंमलात असेपर्यंत बंद करण्यात येईल व त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन कायदयानूसार गुन्हा नोंद करण्यात येईल.
८. मुभा देण्यात आलेल्या दुकान मालकांनी दुकानासमोर नो मॉस्क नो एन्ट्री (मास्क नाही प्रवेश नाही) असे बोर्ड त्यासोबत कोविड त्रिसुत्रीचे पालन करण्याबाबतचे ग्राहकांना आवाहन हयाबाबत डिजीटल किंवा साधा बोर्ड दर्शनी भागात लावणे बंधनकारक राहील.
९. मुभा देण्यात आलेल्या दुकान मालकांनी त्यांचे दुकानासमोर ग्राहकासोबत बोलतांना सुरक्षिततेची उपाययोजना म्हणू पारदर्शक काच/प्लास्टीक कव्हर किंवा इतर शिल्ड साहीत्य ठेवावे तसेच ईलेक्ट्रानिक पेमेंट पध्दतीचा वापर करावा. दुकानासमोर ग्राहकांना योग्य सामाजिक अंतर राखून उभे राहण्याकरीता स्पष्ट दिसेल असे वर्तूळ करण्यात यावे. दुकानासमोरील पाकींगच्या जागेत व ओटयावर सामान ठेवण्यात येऊ नये जेणेकरुन सदर जागा ग्राहकांना उभे राहण्याकरीता वापरता येईल व गर्दी होणार नाही.
१०. ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक व इतर सेवा घरपोच सुरु राहतील.
आदी बाबींचा उल्लेख सदर आदेश मध्ये करण्यात आला आहे.