24 तासात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे दुप्पट ; जिल्हयात 272 कोरोनामुक्त, 111 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 31 मे :-
गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण दुप्पट आहे. जिल्ह्यात 111 जण पॉझेटिव्ह तर 272 जण कोरोनामुक्त झाले असून चार जणांचा मृत्यु झाला. यातील तीन मृत्यु
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर एक मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 4780 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 111 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4669 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1484 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 672 तर गृह विलगीकरणात 812 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 71924 झाली आहे. 24 तासात 272 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 68676 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1764 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 22 हजार 341 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 48 हजार 698 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.56 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.32 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 60 आणि 64 वर्षीय पुरूष व 40 वर्षीय महिला तर खाजगी रुग्णालयात पुसद तालुक्यातील 71 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे .
पॉझेटिव्ह आलेल्या 111 जणांमध्ये 70 पुरुष आणि 41 महिला आहेत. यात आर्णी येथील 6, बाभुळगाव येथील 12, दारव्हा येथील 12, दिग्रस येथील 8, घाटंजी 0, कळंब 1, महागाव येथील 5, मारेगाव येथील 9, नेर येथील 8, पांढरकवडा 4, पुसद येथील 8, राळेगाव 4, वणी येथील 11, यवतमाळ 17, झरीजामणी 4 आणि इतर शहरातील 2 रुग्ण आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1901 बेड उपलब्ध :
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 378 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1901 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 109 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 468 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 108 रुग्णांसाठी उपयोगात तर 418 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 161 उपयोगात तर 1015 बेड शिल्लक आहेत.