सात महिन्यावर आलेल्या माहूर नगरपंचायत निवडणूक व्युव्हरचना जोरात , राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे युवा नेते वेदांत जाधव ची एन्ट्री होण्याची शक्यता…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकिरण देशमुख) :-
माहूर नगरपंचायतची मुदत माहे डिसेंबर २०२१ ला संपणार असून नगर पंचायतची सार्वत्रिक निवडणूक वेळेवरच होणार असे गृहीत धरून अनेक इच्छुकांनी येत्या निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून माजी जि.प. उपाध्यक्ष तथा विद्यमान जि.प सदस्य समाधान जाधव यांचे सुपुत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचा युवा चेहरा म्हणून सध्या चर्चेत आहे, पिता समाधान जाधव यांनी गेल्या वर्षभरापासून वेदान्त ला सक्रीय राजकारणात उतरवून वर्षभरात होणार असलेल्या माहूर नगरपंचायतच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून आसोली ग्रामपंचायत निवडणुकीची संपूर्ण नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. त्या परीक्षेत उतीर्ण होत वेदांत जाधव यांनी १० वर्षाच्या शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावत ९ पैकी ९ जागा जिंकून आणत व सोबत सिंदखेड, सेलू, याही ग्रा.प. मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस ची सत्ता आणून आपल्या विजयपथाची मुहूर्तमेढ रोवल्याने पुढील पिढीसाठी राष्टवादी कॉंग्रेसकडून वेदांत जाधव हा युवा चेहरा असणार असे संकेत दिले आहे. या विजयाने वेदांत जाधव यांचा उत्साह व्दिगुणित झाला असून BBA झालेला हा युवक कमालीचे संघटन कौशल्य आत्मसात केल्याने समविचारी युवकांची मजबूत फळी माहूर तालुका व माहूर शहरात निर्माण केली असल्याचे दिसून येते.याबाबत प्रसारमाध्यमाच्या काही प्रतीनिधिनी माजी जि.प. उपाध्यक्ष तथा जि.प. सदस्य समाधान जाधव यांना विचारणा केली असता त्यांनी पण पक्षाने संधी दिल्यास वेदांत जाधव ला माहूर नगरपंचायतच्या आखाड्यात उतरविणार असल्याचे सांगीतले असल्याने त्यावर शिकामोर्तब झाले आहे.
कोणत्याही परीस्थित माहूर नगरपंचायतची निवडणूक लढवायचीच असा चंग बांधून जाधव पितापुत्रांनी माहूर शहरातील प्रत्येक प्रभागात आपला संपर्क वाढविला असून त्या त्या प्रभागातील बौद्धिक विचारवंत व सज्जन नागरिकांची मने जिंकण्याच्या द्र्ष्टीने जाणीवपूर्वक विविध समाजकार्याच्या माध्यमातून प्रयत्न चालविले आहेत.नागरिकांच्या सुखःदुखःत सहभागी होऊन जनतेत मिसळण्याचा प्रयत्न सुरु असून नागरिकाकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. कुणावर काही संकट ओढवले तर स्वतःहून त्यास संपर्क साधून खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचा पित्याचा गुण आत्मसात केला असल्याने शहरातील अनेक बुद्धिवादी नागरिकांकडून त्यास प्रोत्साहन मिळत असल्याने आगामी माहूर नगरपंचायतच्या निवडणूक रिंगणात तो उतरल्यास सहज विजयी होऊन माहूर न.प.मध्ये शिरकाव करेल असे राजकीय जाणकारातून मते व्यक्तविल्या जात आहेत. शहरात शेकडो युवकांची फळी असलेला युवा नेता म्हणून त्याने मिळविलेली ओळख आगामी राजकारणासाठी वेदांत जाधव यास हीच जमेची बाजू ठरणार आहे. सर्वधर्मसमभाव, अस्सल पुरोगामी विचार, भिडस्तपणा व सेवाभावी वृत्ती या गुणामुळे त्यांच्याकडे माहूर शहराच्या राजकीय क्षितिजावरील एक उगवता तारा म्हणून वेदान्त कडे बघितले जात आहे.