भाजपाने साध्या “हाय वरून हायसे” वाटणारी व्यवस्था उभी केली :- सुधीरभाऊ मुनगंटीवार…. जिल्हा भाजपाच्या वतीने कोविड हेल्पलाईन सुरू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- “भाजपा सेवाव्रताचा वसा घेवून काम करते, जिल्हा भाजपने सर्वसामान्य माणसाला, रुग्णांच्या नातेवाईकांना या वाईट काळात मदत मिळावी म्हणून जिल्ह्यासाठी कोविड हेल्पलाईन सुरू केल्याची बाब गौरवास्पद असून, “फक्त हाय म्हणून मॅसेज टाकल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकाला हायसे वाटणारे आहे, अशी व्यवस्था निर्माण करण्याची ताकद भाजपाच्या संघटनात्मक संस्काराचा भाग असून यवतमाळ जिल्हा भाजपाचे काम वाखाणण्यासारखे आहे असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले. ते आभासी पद्धतीने यवतमाळ जिल्हा कोविड सेंटरचे उदघाटन करीत होते.
माजी मंत्री आ मदन येरावार आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यासाठी कोविड हेल्पलाईन सुरू करण्यात आली. याचे आभासी पद्धतीने ऑनलाईन उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तर उदघाटक म्हणून माजीमंत्री तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार होते. भाजपाने जाहीर केलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्थात हेल्पलाईनवर hii असा संदेश दिल्यास, आपल्याला हव्या त्या शहरातील कोविड स्थिती, कोविड हॉस्पिटल्स, मेडिकल, डॉक्टर, सल्लागार यांची माहिती उपलब्ध करून देण्यात येते.
माजी मंत्री मुनगंटीवार यांनी ” हाय पासून हायसे !” वाटणारी मदत अश्या शब्दात कौतुक केले. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सेवाभावाचे उत्तम उदाहरण म्हणून या उपक्रमाचा गौरव करताना जिल्हा भाजपाला शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ उपेंद्र कोठेकर विदर्भ संघटन मंत्री
आ मदन येरावार, राजेश बकाने प्रभारी यवतमाळ जिल्हा माजी केंदीय मंत्री हंसराज अहीर, आ अशोक उईके, आ निलय नाईक, आ संजय रेड्डी, आ संदीप धुर्वे, आ नामदेव ससाणे जिल्ह्यातील सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, मोर्चा आणि प्रकोष्ट पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजू पडगीलवार तर आभार प्रफुल चव्हाण यांनी मानले.