संचारबंदी झुगारून अनावश्यक दुकान उघडणाऱ्या सुवर्णकारास ५० हजाराचा दंड ; ; महागाव तालुक्यातील पहिली कार्यवाही
पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह
महागाव :
कोरोनाजन्य परिस्थितीत संचारबंदीला झुगारून शासनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या फुलसावंगी येथील एका जेलर्स ला महसूल आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त पथकाने तब्बल ५० हजाराचा दंड ठोठावला आहे.ही महागाव तालुक्यातील पहिली कार्यवाही असून अनावश्यक दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
अत्यावश्यक दुकाने वगळता महागाव तालुक्यातील व्यवसायिक दुकाने उघडत असल्याची बाब महसूल,आरोग्य,पोलीस,आणि स्थानिक प्रशासनाला निदर्शनात आले.त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी महसूल, पोलीस , स्थानिक प्रशासनाला धारेवर धरलं.अश्यातच फुलसावंगी येथील वर्मा ज्वेलर्स व्यावसायिकाने दुकान उघडल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. अधिक चौकशी केली असता दुकान उघडल्याचे प्रशासनाला आढळून आले.त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या नवीन आदेशानुसार तब्बल ५० हजाराचा दंड ठोठावला आहे.ही कार्यवाही तहसीलदार नामदेव इसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डॉ.संतोष अदमुलवाड यांच्या पथकाने केली आहे .

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….