कृषी निविष्ठांची दुकाने आता सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत…
कृषी निविष्ठांची दुकाने आता सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 5 :- राज्यात व जिल्ह्यात 15 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत मार्गदर्शन सुचना निर्गमित केल्या आहेत. मात्र खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून त्यानुसार आता कृषी निविष्ठांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील.
या अंतर्गत सर्व प्रकारची कृषी सेवा केंद्रे, बि-बियाणे, किटकनाशके, खते विक्री केंद्र यांना यापुढे सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकान सुरु ठेवण्यास मुभा देण्यात येत आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कामगार, कर्मचारी यांचे लसीकरण करणे बंधनकारक राहील. सर्व प्रकारचे कृषी उत्पादने व साहित्याच्या पुरवठा हा नियमितपणे चालू राहील. तसेच कृषी साहित्य व कृषी संबंधीत उत्पादने यांच्या मालवाहतूकीकरीता निर्बंध लागू असणार नाही.
वरील दिलेल्या निर्देशाव्यतिरिक्त शासनाच्या पूर्वीच्या आदेशामधील इतर सर्व सूचना व आदेश हे पुर्वीप्रमाणे लागू राहतील. सदर आदेश हे निर्गमित केल्यापासून पुढील आदेशापर्यंत यवतमाळ शहर व जिल्ह्याकरीता शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील.
या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.
०००००००

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….