नेर येथे जिल्हाधिका-यांची ग्रामीण रुग्णालय व तपासणी शिबिराला भेट ; मृत्यु दर कमी करण्यासाठी गांभिर्याने कामे करण्याच्या सुचना…
नेर येथे जिल्हाधिका-यांची ग्रामीण रुग्णालय व तपासणी शिबिराला भेट ; मृत्यु दर कमी करण्यासाठी गांभिर्याने कामे करण्याच्या सुचना…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 4 :- ग्रामीण भागातील कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नुकतीच नेर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच तालुक्यातील माणिकवाडा येथे तपासणी शिबिराला भेट दिली.
यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंह चंदेल, तहसीलदार अमोल पोवार, गटविकास अधिकारी उज्वला ढोले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवी दुर्गे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रतिक खोडवे, ठाणेदार श्री. घुगे, न.प. मुख्याधिकारी नीलेश जाधव आदी उपस्थित होते.
सुरवातीला तालुक्यातील माणिकवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हाधिका-यांनी भेट दिली. यावेळी येथे सुरू असलेल्या तपासणी शिबिराचीसुध्दा त्यांनी पाहणी केली. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत किती गावांचा समावेश होतो, असे विचारून जिल्हाधिकारी म्हणाले, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, कोतवाल तसेच गावचे सरपंच आणि इतर लोकप्रतिनिधींनी गावक-यांना तपासणीबाबत जागृत करणे आवश्यक आहे. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जाणा-या नागरिकांना तपासणीकरीता प्रवृत्त करा. तसेच येथे किती पात्र लोकांचे लसीकरण करण्यात आले, आदींबाबत त्यांनी माहिती घेतली.
तालुकास्तरीय समितीचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी म्हणाले, आपापल्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्तरीय समित्या सक्रीय करा. मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी लवकर तपासणी तसेच लवकर उपचार आवश्यक आहे. त्यामुळे तालुकास्तरीय तसेच ग्रामस्तरीय समित्यांनी टेस्टिंग वाढवावी. विनाकारण बाहेर फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश दिले.
यावेळी त्यांनी नेर येथील ग्रामीण रुग्णालयाचीही पाहणी केली. येथे त्वरीत 10 ऑक्सीजन बेडचे नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच कोव्हीड केअर सेंटरला भेट देऊन त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या अडीअडचणींची विचारपूस केली.
०००००००

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….