महात्मा फुले जण आरोग्य योजनेत सर्पदंश, बाळांतपणाची शस्तक्रिया , कोविड 19 या आजाराचा समावेश करा ; आम आदमी पार्टीचे बालाजी आबादार यांची मागणी…..
महात्मा फुले जण आरोग्य योजनेत सर्पदंश, बाळांतपणाची शस्तक्रिया , कोविड 19 या आजाराचा समावेश करा ; आम आदमी पार्टीचे बालाजी आबादार यांची मागणी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड (राजकीरण देशमुख) :-
महाराष्ट्र शासनाची जन आरोग्य योजना जनतेसाठी उपयुक्त असून त्याबाबत सरकारचे आभार .पण या योजनेमध्ये एकूणच सर्पदंश या विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे यासोबतच जंगली जनावरांनी केलेला हल्ला याचाही विचार झालेला नाही सोबतच बाळंतपणाची शस्त्रक्रिया आणि covid-19 या आजारांचा समावेश झाल्यास समाजाच्या मोठ्या घटकाला त्याचा फायदा होईल . या चार आजाराबाबत अफरातफर होण्याची कोणतीही शक्यता नाही. सर्पदंश आणि जंगली जरा जनावरांची हमले आणि बाळंतपण याबाबत आणि कोविड-19 चा कुठलाही देखावा कुणीही निर्माण करू शकणार नाही. पण जवळपास 60 टक्के जनता ग्रामीण भागात राहते आणि ग्रामीण भागांमध्ये विषारी सापांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे दुर्दैवाने काही लोक सर्पदंशाचे बळी पडतात. अशा कठीण प्रसंगी आधार मिळावा म्हणून या आजारांचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश व्हावा ही विनंती निवेदनाद्वारे आम आदमी पार्टी नांदेड जिल्हाध्यक्ष बालाजी आबादार यांनी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….