पुसद तालुका कांग्रेस कमेटीच्या अध्यक्षपदी शरद ढेंबरे यांची नियुक्ती….
पुसद तालुका कांग्रेस कमेटीच्या अध्यक्षपदी शरद ढेंबरे यांची नियुक्ती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- पुसद काँग्रेस कमिटीच्या अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या तालुका अध्यक्ष या पदावर बोरगडी ग्राम पंचायतीचे सदस्य व अनेक सामाजिक चळवळीत सक्रिय शरद ढेंबरे या युवा कार्यकर्त्याची प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने जिल्हा अध्यक्ष आ.डॉ. वजाहत मिर्झा यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.
आपल्या नियुक्तीबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अधयक्ष नाना पटोले,राष्ट्रीय सचिव व महा.राज्य उपाध्यक्ष सचिनभाऊ नाईक , राज्य उपाध्यक्ष माणिक जगताप , जिल्हा अध्यक्ष आ.वजाहत मिर्झा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.मोहम्मद नदीम यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष महेशभाऊ खडसे , यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अजय पुरोहित , जिल्हा सचिव अशोक बाबा उंटवाल , नारायणराव अंभोरे , शहराध्यक्ष जकी अन्वर या सर्व नेत्यांना निवडीचे श्रेय दिले व तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या प्रचार व प्रसार करून पक्ष मजबुती साठी व पुसद तालुक्यामध्ये गावा गावात जाऊन पक्ष वा डी साठी काम करणार असल्याचे सांगितले त्यांच्या नियुक्तीबाबत समाजात व पक्षा सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. आणि युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अभिलेश खैरमोडे युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष नईम खान , कैलास मारकड यांनी नवनियुक्त अध्यक्ष यांचे स्वागत व अभिनंदन केले

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….