पुस नदी पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला….
पुस नदी पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :-
पुस नदी पात्रात अज्ञात इसमाच मृतदेह दुपारी आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे.मृतक तरुण हा पंचवीस से तीस वयोगटातील असल्याचा कयास लावला जात असून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना अद्यापही यश आले नाही.
मिळालेल्या प्राप्त माहिती नुसार ,दुपारी साडेबाराच्या सुमारास पुस नदी पात्रात मच्छिमार करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस मांग डोह म्हणून ओळख असलेल्या पुस नदी पात्रात मृतदेह तरंगताना दिसून आला.घटनेची माहिती महागाव पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला.परंतु सदर मृतदेह पाण्यामुळे पूर्णतः सडलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहाची ओळख पटली नाही.पोलिसांनी पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी सवना येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.मृतकाच्या अंगावर काळसर कलरचे टी शर्ट असून काळा पँट आहे.सदर व्यक्ती ओळखीचा असल्यास महागाव पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांनी केले आहे.